News34 गुरू गुरनुले
मुल – शैक्षणिक सत्राला सुरुवात होताच एस. टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था तात्काळ करायला पाहिजे परंतु तशी व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे ग्रामीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते याला जबाबदार एस. टी.महामंडळ असते.
अशी प्रतिक्रिया ग्रामीण ग्रामस्थांची आहे. व दरवर्षीच विद्यार्थी व राजकीय संघटना निवेदन दिल्याशिवाय विभाग नियंत्रक जागे होत नाही ही वस्तुस्थिती आहे. मूल तालूक्यातील मौजा विरई येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी बस नाही. त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील बस पाईंटवरच ताटकळत बसून राहत आहेत. करीता त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याकरीता विरई बस त्वरित सुरु करावे अशी मागणी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेस तर्फे देण्यात मुल वाहतूक नियंत्रक यांना देण्यात आले. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, संचालक घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी,बाबराळा सरपंच धीरज गोहणे, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, एन.एस. माथनकर, टी .जी. निमसरकार, एस.एन.चौधरी, बी.एच.सलाम, व्ही.डी. मोडक, ऋतिक पोगुलवार , नितीन अल्गुंनवार ,अनिकेत केलझरकर,वैभव गावतुरे, आदित्य पधरे, प्रफुल येलचलवार यांचेसह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. तात्काळ बस सुरू झाली नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांना व पालकांना सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. Msrtc
बाबराळा येथे त्वरित बस पाठवावी- सरपंच धीरज गोहणे
बाबराळा हे गांव तालूक्यातील ग्रामीण भागात येत असून बाबराळा गावात फक्त इयत्ता 4 थ्या वर्गापर्यंतचे शिक्षण आहे. पुढील शिक्षणाकरीता बाबराळा या गावातील मुला-मुलींना बाहेरगांवी किंवा तालूक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणे भाग आहे. व बाबराळा गावापासून तालूक्याचे ठिकाणी 15 ते 16 कि.मि. अंतरावर आहे. आणि माध्यमिक शाळा बेबाळ व भेजगांव या गावात असल्याने त्याही गावाचे अंतर 4 ते 5 कि.मि. वर असून बाबराळा गावात मुला-मुलींना जाण्यासाठी व येण्यासाठी कोणतेही वाहतुकीचे साधन नाही.
त्यामुळे बाबराळा गावाला शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्या विभागाकडून बाबराळा गावाला त्वरीत बस सुरु करण्यांत यावी. किंवा भेजगांव बेंबाळ मार्ग सुरु असलेली बस बाबराळा गावाला पाठविण्याची सोय आपल्या विभागामार्फत करण्यात याची अशी मागणी बाबराळा येथील सरपंच श्री. धिरज गोहणे यांनी विद्यार्थ्याच्या व ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
तसेच बाबराळा गावातील शेतकरी व अन्य नागरीकांना आपले शासकीय कामे करुन घेण्यासाठी नेहमी मुल तालूक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे. परंतू गरीब नागरीकांना येण्याची कुठलीही सोय नाही. करीता ही बस सुरु केली तर ग्रामस्थांना देखील येण्यासाठी सोईचे होईल. वरील दोन्ही समस्यांची त्वरीत दखल घेऊन बाबराळा येथे त्वरीत बस सुरु करावी अशी मागणी बाबराळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून चंद्रपूर येथील विभाग नियंत्रकांनी लक्ष देऊन दोन्ही ठिकाणी बसची व्यवस्था करावी अशी मागणी तालुका काँग्रेसने केली आहे.
Discussion about this post