News34
चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात पश्चिम दिशेला मुख्य तट क्रमांक 2 जवळ पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीस्थळ आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोहर्रम सणानिमित्त 28 व 29 जुलै रोजी पूर्व प्रथेप्रमाणे कारागृह परिसरात उर्स आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते.
या कालावधीत कारागृह परिसरातील पुज्य हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार आहे. कारागृहाच्या आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन, कॅमेरा, खाद्यपदार्थ जसे पेढे, बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसे आढळून आल्यास संबंधितांना प्रवेश नाकारण्यात येईल. नियमांचे पालन करूनच भाविकांनी समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले आहे.
Discussion about this post