News34
चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, पाऊस आला पण शेतात काम करताना वन्य प्राण्यांचे हल्ले आता सतत वाढत आहे. चंद्रपूर जिल्हा अलर्ट मोड वर
चिमूर तालुक्यात नुकताच डोमा येथे 60 वर्षीय शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते, त्या घटनेला 4 दिवस लोटत नाही तोच पुन्हा वाघाने एकाला ठार केल्याची घटना 18 जुलै ला सायंकाळी घडली.
तालुक्यातील बामनगाव येथील ऋषी किशन देवतळे वय 60 वर्ष हे आपल्या शेतामध्ये 4.30 च्या दरम्यान काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला चढविला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बफर धानकुटे चिमूर यांना देण्यात आली असून वनविभागाने या घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले होते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून वाघाचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
Discussion about this post