सावरटोला येथे एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उद्या
संजीव बडोले, प्रतिनिधी
नवेगावबांध, दि. १ मे
श्रीहरी डेरी आणि पशुखाद्य भंडार यांच्या वतीने एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण दिनांक २ मे रोजी, शुक्रवारला, सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सावरटोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये गोठा बांधणी, आहार व्यवस्थापन, दूध उत्पादन आणि गुणवत्ता वाढ, दुधाळ जनावरांची निवड, चारा व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य, माज आणि लक्षणे, कृत्रिम रेतन व अनुवंशिकता, प्रसूती व त्यानंतरची काळजी, लहान वासरांचे दूध नियोजन आणि जनावरांचे जंत निर्मूलन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात पंचायत समिती अर्जुनीमोरगावचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उज्वल बावनथडे, कृषी विज्ञान केंद्र साकोलीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उषा डोंगरवार आणि विषयतज्ज्ञ डॉ. प्रवीण खिल्लारे हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांच्या शेती, शेळीपालन व कुक्कुटपालन संबंधित समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. अधिकाधिक दुग्ध व्यवसायिक आणि पशुपालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रशिक्षण सर्वांसाठी विनामूल्य असून उपस्थित राहणाऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येईल.
Discussion about this post