दिलीप पनकुले यांची सरचिटणीसपदी नियुक्ती
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस दिलीप पनकुले यांची प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रदेश सरचिटणीसपदी म्हणून नियुक्ती केली आहे. दिलीप पनकुले यापूर्वी निरिक्षक चंद्रपूर (ग्रामीण) जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहे. दिलीप पनकुले यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी गृहमंत्री मा. आमदार अनिल देशमुख व माजी मंत्री रमेशचंद्र यांना देऊन त्यांचे व सर्वच पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार मानले. या नियुक्तीच्या संदर्भात बोलताना, “पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची परतफेड मजबूत पक्षबांधणी करून व माझी सर्व शक्ती एकवटून पक्षाचे सशक्त संघटन उभे करीलअसा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ह्या प्रसंगी माजी आमदार दिनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंग परिहर अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब प्रामुख्यानं उपस्थीत होते. कार्यकर्ते यांनी या नियुक्तीबद्दल भाईजी मोहोड संजय शेवाळे रविन्द्र मुल्ला सोपानराव शिरसाट माचींद्र आवळे विजय मसराम विलास पोटफोडे ह्यांनी दिलीप पनकुले यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना संपूर्ण सहकार्य करणार अशी ग्वाही दिली.
Discussion about this post