News34
चंद्रपूर : मणिपूरमधे मानवतेला काळीमा फासणाऱ्या, महिला अत्याचाराच्या भयावह घटनेच्या विरोधात आज वरोरा महिला काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात डॉ. आंबेडकर चौकात पार पडलेल्या या आंदोलनात शेकडो पुरुष व महिला कार्यकर्ते व आदीवासी बांधव सहभागी झाले होते.
मणिपूर च्या त्या घटनेविरुद्ध चंद्रपुरात आक्रोश मोर्चा
नव्वद दिवसापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार व महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यात राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मनाचा थरकाप उडवणाऱ्या तेथील घटना अत्यंत लज्जास्पद व संतापजनक आहे. त्यामुळे मणिपूरात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
त्या बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह मिळाला
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. महींलावर अत्याचार करणाऱ्यां फाशी द्या, मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लावा व भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या.
यावेळी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदा खामनकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, माजी सभापती राजेंद्र चिकटे, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग,भोजराज झाडे,प्रमोद मगरे,माजी नगरसेवक प्रमोद काळे, विजय पुरी, सन्नी गुप्ता,आसीफ रजा,राहुल देवडे, प्रफुल्ल आसुटकर, योगेश लोहकरे, सुभाष दांदडे, विनोद बाफना ,बाळू चिंचोलकर, अमर गोंडाने, माझी जि प सदस्या सुनंदा जीवतोडे, रत्नमाला अहिरकर, शिरोमणी स्वामी, मंगला पिंपळकर, प्रतिमा जोगी, उज्वला थेरे, प्रतिमा जीवतोडे,राकेश दोन्तावार ,योगेश खामनकर ,अयुब पठाण, राहील पटेल ,राहुल ननावरे, भानुदास ढवस, सुरेश मडावी, पितृजी आत्राम,राजेश्वर येरमे, मधुकर मेश्राम, प्रतिमा कातकर, पुष्पा मंगाम, वनिता परचाके, संगीता गेडाम, लता मेश्राम, विना कनाके, छबु पेंदाम, मंदा मेश्राम, लता आत्राम, तुळसाबाई मेश्राम, राईबाई येरमे, अनिता मडावी यांची उपस्थिती होती.
Discussion about this post