News34
Sambhaji bhide in chandrapur
चंद्रपूर – :- चंद्रपुरात संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीदरम्यान आयोजक व विरोधकांमध्ये सभास्थळी राडा झाला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अनुचित घटना घडली नाही.
चंद्रपूरच्या अग्रसेन भवन दाताळा मार्ग परिसरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक प्रमुख संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्हा प्रवेश व बैठकीला उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन व खडा पहारा संदर्भात असलेली भिडे यांची ही नियोजन बैठक उधळून लावण्याचा इशारा देत शेकडो विरोधी कार्यकर्ते बैठक स्थळी पोहचले.
सोमवारी चंद्रपुरात आक्रोश मोर्चा
विरोधी कार्यकर्ते बैठक स्थळीप्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दोन्हीकडून जोरदार नारेबाजी झाली. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावत नारेबाजी करणाऱ्या उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
चंद्रपुरातील 2 भाऊ म्हणतात गुन्हे करू मिळून खाऊ
चंद्रपुरात घटनाविरोधी -देशविरोधी संभाजी भिडे यांचे नियोजन हाणून पाडणार असल्याचा निर्धार विरोधी कार्यकर्त्यांनी अटकेनंतर व्यक्त केला. भिडे गुरुजींची नियोजन बैठक मात्र पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाली आहे.
Discussion about this post