किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड.
उद्या शनिवारी होणार वितरण.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१.
झक्कास मराठी मीडिया गोंदिया चे युथ आयकॉन पुरस्कार २०२५ साठी येथील रहिवासी व सुजल सेवा समिती नवेगावबांधचे अध्यक्ष किशोर तरोणे व वडेगाव रेल्वे स्टेशन येथील रहिवासी,झाडीपट्टीच्या बहिणाबाई सुप्रसिद्ध साहित्यिका अंजनाबाई खुणे यांची निवड झाली आहे.
दि. २२ नोव्हेंबर रोज शनिवारला हॉटेल ग्रँड सीता,तिरोडा रोड गोंदिया येथे सकाळी १०.०० वाजता झक्कास मराठी मीडिया ग्रुप गोंदिया च्या वतीने व्हिजन गोंदिया झक्कास मराठी कॉन्क्लेव्ह ह्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात उभयतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अंजनाबाई खुणे या एक झाडीबोलीतील कवयित्री असून, त्यांना ‘झाडीपट्टीची बहिणाबाई’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी ‘झाडीबोली’ या बोलीभाषेतील कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि त्यांच्या कविता झाडीबोलीतील साहित्यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.
किशोर तरोणे यांनी शेतीच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. त्याबरोबरच सुजल सेवा समितीच्या माध्यमातून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
















Discussion about this post