जुन्नर /आनंद कांबळे वार्ताहर
जुन्नर तालुका प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या मासिक मिटिंग मध्ये सत्ताधारी व विरोधी गटात मारामारी ,शिवीगाळ झाली. याप्रकरणी परस्पर तक्रारी दाखल झाल्या. जुन्नर पोलिसांनी २१आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिस निरिक्षक नारायण पवार यांनी दिली.
जुन्नर तालुका सहकारी पतसंस्थेची रविवारी दुपारी मासिक मिटिंग होती. या मिटिंगमध्ये मारामारी ,शिवीगाळ ,दमदाटी करण्यात आली याबाबत परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मिटिंग सुरु असताना सत्ताधारी गटाच्या संचालिका सविता कुराडे या बोलत असताना विरोधी गटाचे संचालक विजय कुराडे हे फिर्यादी सविता कुराडे याचा मोबाईलमध्ये शुटिंग काढत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी माझी शुटिंग का काढता असे विचारले असता आरोपी संचालक विजय कुराडे यांनी फिर्यादीच्या छातीवर हात ठेवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत जाब विचारला असता फिर्यादीच्या कानशिलात मारुन शिवीगाळ केली.तसेच भांडण सोडविण्यासाठी संचालक दिलीप लोहकरे आले असता त्यांना देखील मारहाण केली. पोलिसांनी आरोपी विजय कुराडे यांच्या विरोधात भादवी कलम ३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला .
संचालक दिलीप लोहकरे यांनी विरोधी गटाचे संचालक विजय कुराडे व बाळू लांघी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. भांडण सोडविण्यासाठी गेलो असता विजय कुराडे यांनी जातीवाचक शिवीगाळ ,दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली .तसेच बाळू लांघी यांनी शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण केली तसेच तू बाहेर ये ,तुझा काटाच काढतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली . पोलिसांनी विजय कुराडे व बाळू लांघि यांच्या विरोधात भादवी कलम ३२७,३२३,५०४,५०६ व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला,
विरोधी गटाचे संचालक बाळू लांघी यांनी सत्ताधारी गटाच्या १९जणांविरोधात तक्रार दाखल केली.
बाळू लांघी सदर मिटिंगमध्ये बोलत होते की,सत्ताधारी गटाने नियमबाह्य कर्ज वाटप केले आहे. याचा राग मनात येवून सत्ताधारी गटाच्या संचालिका सविता कुराडे लांघी यांना विरोध केला व जातीवाचक शिवीगाळ केली. जातीवाचक बोलून अपमानित केले. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या १९जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी सविता कुराडे , विजय लोखंडे ,दत्तात्रय घोडे,अंबादास वामन, सचिन मुळे ,संतोष पाडेकर, जितेंद्र मोरे,अनिल कुटे,नानाभाऊ कणसे , सुनिता वामन ,पूनम तांबे, सुभाष दाते , विवेकानंद दिवेकर,अविनाश शिंगोटे,ज्ञानेश्वर मोढवे ,प्रमोद मोजाड,संदीप पुरवंत,ज्ञानेश्वर गवारी,दिलीप लोहकरे यांच्या विरोधात भादवी कलम ३२७,१४३,१४७, १४९ ३२३,५०४,५०६ व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक आधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
चौकटीसाठी मजकूर
जुन्नर तालुका प्राथमिक सहकारी पतसंस्थेने नुकताच शताब्दी महोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक आहे.
अश्या पतसंस्थेच्या संचालक मंडळात हाणामारी ,शिवीगाळ होणे अशोभनीय आहे,
रविवारी रात्री जुन्नर पोलिस स्टेशनसमोर शिक्षकांनी गर्दी केली होती.
Discussion about this post