News34 chandrapur
चंद्रपूर : भूमिपुत्र ब्रिगेड आणि अन्य परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १६ जुलै रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून कास्ट मास्टर्स या पुस्तकाचे लेखक, हॉवर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे स्कॉलर्स डॉ. सुरेश एंगडे, बाळासाहेब मिसाळ पाटील राहणार आहेत. बाळासाहेब मिसाळ पाटील हे इव्हीएम भारतीय लोकशाहीसाठी का घातक? या विषयावर मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विनोद नगराळे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. अभिलाषा गावतुरे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. चेतन खुटेमाटे, हिराचंद बोरकुटे, बळीराज धोटे, ॲड. दत्ता हजारे, डॉ. सचिन भेदे, खुशाल तेलंग, नेताजी भरणे, प्रमोद काकडे, ॲड. वैशाली टोंगे, प्रब्रह्मानंद मडावी, नरेन गेडाम, सुरेंद्र रायपुरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला चंद्रपुरातील परिवर्तनवादी चळीवळीतील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. गावतुरे व अन्य आयोजकांनी केली.
Discussion about this post