News34
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही चंद्रपूर शहराला याचा मोठा फटका बसलेला आहे. गेल्या रात्रीपासून चंद्रपूर शहरात सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
तसेच वैनगंगा नदीचे पाणीदेखील ओसंडून वाहत असल्याने आता हे पाणी चंद्रपूर शहरात शिरायला लागले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट, आरवट, पठाणपुरा, रहमत नगर, सिस्टर कॉलनी येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मनपा आणि चंद्रपूर पोलिसांच्या तीन पथकं यासाठी कार्यरत आहे.
सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात देखील वैनगंगा, इरई आणि वर्धा ही तुडुंब भरून वाहत आहे. पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने आता हे पाणी नागरी वस्तीत शिरायला लागले आहे. बचावकार्य जिल्हा पातळीवर सुरू आहे.
पिपरी देश गावात पुराचा हाहाकार
भद्रावती तालुक्यातील पिपरी देश गावाच्या चारही बाजूला वर्धा नदीचे पाणी शिरल्याने गावातील तब्बल 70 टक्के शेती पाण्याखाली आली आहे.
वेकोलीच्या ओव्हरबर्डन मुळे वर्धा नदीचे पाणी सरळ गावात शीरते, गावातील नागरिकांनी याबाबत अनेकदा पालकमंत्री, आमदार, वेकोली अधिकारी, जिल्हाधिकारी याना अनेकदा निवेदने दिली मात्र यावर प्रशासन उदासीन आहे, आज पावसाने जिल्हयात हाहाकार माजविला असताना शहरातील परिस्थिती पुराने विस्कळीत झाली आहे.
सध्या पिपरी गावात पाणी शिरत आहे, गावातील तब्बल 700 नागरिक थांबुन आहे, पाणी वाढल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर मनपाचे बचावकार्य सुरूच
मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शहरात हाहाकार माजविला आहे, शहरातील अनेक भागात नदी, नाल्याचे पाणी शिरल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून मनपा, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस दलाच्या बचाव पथकाने आतापर्यंत तब्बल 312 नागरिकांना मनपाच्या शाळेत स्थलांतरित केले आहे.
इराई धरणाचे 2 दरवाजे 0.25 मीटरने उघडल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिका ने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाल्यात कार गेली वाहून
पोम्भूर्णा – आकसापूर मार्गावरील बेरडी नाल्यावरून चारचाकी वाहन वाहून गेली. पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, सकाळपासून जिल्ह्यात सुरू असलेला पावसाने गोंडपीपरी तालुक्याकडे जाणाऱ्या पोम्भूर्णा- आकसापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर अमित गेडाम हे आपल्या चारचाकीने निघाले होते, मात्र नाला तुडुंब भरून वाहत असल्याने त्यांनी वाहन त्या मार्गावर टाकले, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार नाल्यात वाहून गेली, गेडाम यांचं वाहन तब्बल 1 किलोमीटर अंतरावर आढळले, मात्र त्या वाहनात अमित गेडाम नव्हते, त्यांचा पोलीस पथक शोध घेत आहे.
अमित गेडाम हे पोम्भूर्णा तहसील कार्यालयात पुरवठा सहायक म्हणून कार्यरत होते, त्यांच्याकडे गोंडपीपरी च्या शासकीय गोदमाचा प्रभार असल्याची माहिती आहे.
पावसाची नोंद
चंद्रपूर जिल्ह्यात 28 जुलै 2022 पर्यंत तब्बल 684 मिमी पावसाची नोंद झाली होती तर 28 जुलै 2023 पर्यंत 690.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तेलंगणा-महाराष्ट्र वाहतूक ठप्प
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागातील
१) राजुरा -बल्लारपूर ,
२)राजूरा – सास्ती,
३) धानोरा -भोयगाव,
४)गौवरी कॉलनी – पोवणी , ५)तोहोगावं
६)कोरपना – कोडशी (अधे मधे बंद चालू स्थितीत )
७)रूपापेठ – मांडवा ,(अधे मधे बंद चालू स्थितीत )
८) जांभूळधरा – उमरहिरा ,( अधे मधे बंद चालू स्थितीत ) ९)पिपरी – शेरज ,
१०) पारडी – रुपापेठ (अधे मध्ये बंद चालू स्थितीत )
११)कोडशी – पिपरी,१२) कोरपना – हातलोणी , (अधे मध्ये बंद चालू स्थितीत ) १३)कुसळ – कातलाबोडी – कोरपना
१४) शेरज – हेटी ( अधे मधे बंद चालू )
१५) वनसडी – भोयगाव
१६)विरूर स्टेशन -वरूर रोड़
१७)विरूर स्टेशन -सिंधी
१८)विरूर स्टेशन -लाठी
१९) धानोरा -सिंधी
२०)विरूर-सिरपुर
२१)चिंचोली -अंतरगाव सिरपुर २२)सुबई – चिंचोली
Discussion about this post