News34
चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. Vanchit bahujan aghadi
वंचित बहुजन आघाडीचे कुशल मेश्राम, राज्य कार्यकारणी सदस्य, राजेश बोरकर जिल्हा प्रभारी पुराणिक गोंगले, जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग, सोमाजी गोंडाने, जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग, जयदीप खोब्रागडे जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व विभाग, कविताताई गौरकार, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, बंडूभाऊ ठेंगरे महानगर अध्यक्ष चंद्रपूर, तनुजाताई रायपुरे, महानगराध्यक्ष महिला आघाडी, सतीशभाऊ खोब्रागडे, महानगर कार्याध्यक्ष, शुभम मंडपे, जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, निखिल रत्तेवार शहराध्यक्ष युवक आघाडी, धीरज तेलंग,जिल्हाध्यक्ष सम्यक वी.आंदोलन यांच्या नेतृत्वाखाली डा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून त्यांना वंदन करून येथून हा मोर्चा काढण्यात आला. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग पुराणिक गोंगले यांनी प्रास्ताविक करतांना महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लढा उभारला असून या लढ्यात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले. Prakash ambedkar
यावेळी राजेश बोरकर जिल्हा प्रभारी ,सोमाजी गोंडाने, जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग, जयदीप खोब्रागडे जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व विभाग, कविताताई गौरकार, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, तनुजाताई रायपुरे, महानगराध्यक्ष महिला आघाडी, सतीशभाऊ खोब्रागडे,महानगर कार्याध्यक्ष, शुभम मंडपे, जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना सत्ताधारी मंडळींचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करून जातीयवादी विचारसरणीचे सरकार उलथून टाकण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीत असल्याचे सांगितले.
विश्वकर्मा कुटुंबाची शेवटची सेल्फी आणि त्यानंतर घडले भयानक
वंचित बहुजन आघाडीचे कुशलभाऊ मेश्राम, मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचारास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादी प्रवृतीला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करावे, असे आवाहन केले.
या सभेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्ाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील अत्याचार रोखण्याची तसेच अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत व अत्याचार प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले.
या जन आक्रोश मोर्चातचे संचालन सुभाष डोलणे तर आभार रुपचंद निमगडे यांनी केले तसेच यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Discussion about this post