रुग्णवाहिकेअभावी चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात ४ वर्षाच्या मुलाचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागावर तीव्र टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत वाईट आहे. रिक्त जागांमुळे आणि ॲम्बुलन्स सेवांमधील कमतरतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 70% आरोग्य विभागातील जागा रिक्त आहेत. ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे आणि ॲम्बुलन्समध्ये चालक नसल्यामुळे चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आर्यन तलांडी असे त्याचे नाव आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला होता. आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची आणि ॲम्बुलन्स सेवा सुधारण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार केली आहे. विधासभा अध्यक्षांनी या गंभीर बाबीची दखल घेण्यासाठी आणि लवकर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आवाहन केले आहे.
Discussion about this post