News34
चंद्रपूर – वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी योग्य रित्या केल्यावर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी पक्षाला राम राम करीत भारत राष्ट्र समिती म्हणजेचं BRS मध्ये प्रवेश केला.
8 जुलै ला तेलंगणा येथे पक्षाचे सर्व्हेसर्वा राज्याचे मुख्यमंत्री KCR यांच्या प्रमुख उपस्थितीत भूषण फुसे यांनी BRS मध्ये प्रवेश केला.
चंद्रपुरात खाजगी बसचा भीषण अपघात
चंद्रपूर जिल्ह्यातील जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून कमी वेळात फुसे राजकारणातील मोठे नाव झाले, अनेक ठिकाणी नागरिकांच्या समस्या घेऊन त्यांनी विविध आंदोलने करीत न्याय मिळवून दिला.
नुकतेच त्यांना वंचित ने राजुरा विधानसभेची जबाबदारी दिली होती, मात्र पक्षाच्या अंतर्गत कुरघोडी मुळे त्यांना पक्ष सोडावा लागला.
आता तोच चेहरा तेच नाव पुढे करीत ते नव्या उमेदीने BRS पक्षात नव्या उत्साहाने काम करणार आहे.
भूषण फुसे काय म्हणाले?
राजकीय जीवनात अनेक अडचणींना सामोरे जात कार्यकर्त्यांच्या सोबत आधी सामाजिक क्षेत्रात त्यानंतर राजकीय पक्षात प्रवेश घेतला होता, अनेक जन आंदोलने केली, मात्र मी अंतर्गत राजकारणाचा बळी पडलो त्यामुळे मी BRS पक्षात प्रवेश घेतला आहे.
माझी राजकीय इच्छापूर्ती काही नाही फक्त नागरिक मूलभूत समस्येपासून वंचित राहू नये, मात्र तसे झाल्यास भूषण फुसे त्यांच्या मागे नेहमी उभा राहून न्याय देण्याची भूमिका पार पाडणार.
Discussion about this post