News34
चंद्रपूर:- गेल्या दोन ते तीन दिवसात चंद्रपूर शहरात पावसाचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. दि. १८ जुलै रोजी चंद्रपूर शहरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत दिसत आली. जवळपास १९५ mm पाऊस दर्शविला गेला. वाघाने अडवली पर्यटकांची वाट
गेल्या काही वर्षांत चंद्रपूर शहरात सर्व ठिकाणी कॉंक्रिटीकरण म्हणजेच सिमेंटचे रस्ते तयार झाले. मात्र गटारांची व्यवस्था फारशी काही व्यवस्थित आढळली नाही. चंद्रपूर शहरात या आधीही अश्या प्रकारचा पाऊस येऊन गेला आहे. पण डांबरचे रस्ते असल्याने गटाऱ्याच्या व्यवस्थेला फारशी काही गरज पडली नाही व रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या असायच्या, पण सिमेंटचे रस्ते बनल्यापासून गटारांची व्यवस्था ही भूमिगत करण्यात येत आहे. त्यामुळे गटारांची व्यवस्था करणे ही खूप जबाबदारी चे काम आहे. थरारक हत्याकांड
इंजीनियरिंग कॉलेजेस मधील विद्यार्थी खासकरून स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे आपल्या अंतिम वर्षात प्रोजेक्ट करत असतात. त्यात अनेक प्रकारचे “रोड” वर प्रोजेक्ट केले जातात. पावसाचे पाणी रस्त्यातून जमिनीत जाण्याचा मार्ग तयार करणे हा त्यांचा मूल हेतू असतो. चंद्रपूर शहरात काँक्रिटीकरण झाल्यापासून असे प्रोजेक्ट खूप बघायला भेटतात.
चंद्रपूर शहराचे नियोजन देखील फारसे काही व्यवस्थित दिसून येत नाही. जेव्हा सिमेंटचे रस्ते बनवले जातात तेव्हा डांबरचे रस्ते हे पूर्णपणे खोदल्या जात नाही व डांबरच्या रस्त्यावरूनच सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येते त्यामुळे रस्त्याची पातळी वर दिसून येते आणि जमिनीची पातळी ही खालीच असते. त्यामुळे अनेकांच्या घरी देखील पावसाचे पाणी जमा होत दिसून येत आहे.
प्रशासनाला विनंती आहे की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून असे प्रोजेक्ट बनवायला प्रवृत्त करावे आणि पूर परिस्थितीच्या कारणांकडे लक्ष देऊन चंद्रपूर शहराचे नियोजन व गटारांची व्यवस्था व्यवस्थितपणे व्हावी याच्याकडे लक्ष द्यावे आणि चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अशी परिस्थिती पुन्हा न व्हावी याची दक्षता घ्यावी. हीच विनंती!
– श्रेयस शेंडे
Discussion about this post