News34
गुरू गुरनुले
मुल – गोसेखुर्द आसोला मेंढा प्रकल्प अंतर्गत लाभक्षेत्र असलेल्या मुल – चांदली मायनर, फिस्कुटी- राजगड मायनर, फिस्कुटी मायनर नुकत्याच आलेल्या अती पाऊसामुळे- अनेक ठिकाणी फुटल्यामुळे राजगड येथील शेतकरी सुरेश पा. मारकवार यांचे शेतात पाणी वाहून गेल्याने धान पऱ्हे पूर्ण वाहून गेले.
शेतात रेती जमा झाली पीक तर गेलेच लाख रुपयाची नुकसान झाली. प्रदीप कामडे यांचे शेतात प्रतेक बांधीत पाळे फुटून मोठ्या खांडी पडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सोबतच प्रमोद जेनठे, देवानंद जेगठे यांच्याही शेतीचे नुकसान झाल्याने पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधून माहिती दिली. परंतु त्याची तात्काळ दाखल घेण्यात घेतल्या गेली नाही.
यासाठी संबंधित शेतकरी काँग्रेस नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत झालेली नुकसान सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार यांनी लक्षात आणून दिल्याने रावत यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राकेश रत्नावार, माजी सभापती व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले ,राजू पा. मारकवार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.व विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोनुने यांना फोन करुन नुकसानीची जाणिव करुन दिली असता तात्काळ २४ तासात जेसीबी पाठऊन मायनर दुरस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित डोर्लीकर मोक्यावर उपस्थित होते.
तालुक्यातील आदर्श ग्राम म्हणून राज्यस्तरावर प्रसिद्ध असलेल्या राजगड येथील शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासन दुर्लक्ष करीत असेल तर आमचेकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी केला. प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळावे म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिकारी यांनी आसोला मेंढा मुख्य नहराला पासून राजगड, चांदली, फिस्कुटी लाभक्षेत्रसाठी जोड कालव्याचे काम उन्हाळ्यामध्ये करण्यात आले. त्यावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे काम मजबूत करायला पाहिजे होते.
पण ते निकृष्ट दर्जाचे केल्याने पहिल्याच पाऊसात मायनर तीन चार ठिकाणी फुटल्याने कालव्याचे पाणी वाहत जाऊन धान परह्याची,आवत्या पेरणीची शेतकऱ्यांची नुकसान झाली. याला जबाबदार गोसेखुर्द आसोला मेंढा प्रकल्प मायनरचे काम करणारे अधिकारी व इंजिनियर जबाबदार असल्याचे शेतकरी बोलून दाखविले.
यावेळी विनोद मारकवार,सुरेश कावळे,प्रदीप कामडे, नवनाथ गुरनुले, फिस्कुटी माजी सरपंच अनिल निकेसर, अशोक मोहरले,देवानंद जेंगठे, प्रमोद जेगठे यांचेसह काही शेतकरी बांधव उपस्थित होते. काँग्रेस नेते संतोषशिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांसमोर २४ तासाचा अल्टिमेट दिल्यामुळेच त्वरित काम करून देण्याचे आश्वासन दिले.
Discussion about this post