News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – गतवर्षी भेजगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत तीन रेतीघाट प्रशासनाने लिलावात काढले व ज्या कंत्राटदाराला रेती काढण्याचे काम दिले त्यांनी अधिक नफा कमविण्याच्या लालसे पोटी नियमात नसतांनाही दिवस-रात्र पोकलँड मशीन वापरून रेतीचे उत्खनन केले. व शेतकऱ्यांच्या शेतामधून जडवाहनांनी रेती वाहतूक केली त्यामुळे शेतात टाकलेले मोटर पंपाची अंतर्गत भूमिगत पाईपलाईन तोडफोड झाली त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामातच शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
पुतण्याने केली मोठ्या आईची हत्या, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार
याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपासून कंत्राटदारांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सदरहू रेती घाटाचा लिलाव तीन पार्टनर मिळून करीत असल्याने एकाला विचारले तर इतर भागीदारांना विचारतो म्हणून दोन महिने घालविले, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून खरिपाचा हंगाम सुरू झाला असल्याने पाईपलाईन अभावी शेतकरी शेतीत लावलेले पिकाला पाईप लाईन फोडून ठेवल्याने पाणी देऊ शकत नाही त्यामुळे गरीब शेतकरी अडचणीत सापडला आहेत.
17 वर्षाच्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल
भेजगाव येथील रहिवासी असलेल्या व दहेगाव चक शिवारात शेती असलेले कैलास मोहूर्ले या शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले आहे. घाट लिलावा करिता देताना शासनाच्या काही नियम अटी असतात मात्र कोणत्या दराने व सर्व नियम धाब्यावर बसवत तालुका प्रशासनाला अंधारात ठेऊन अवैधपणे रेतीचा उपसा केला. त्यामुळेच कंत्राटदारांची मनमानी सुरु आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये असून या बाबीकडे तालुका प्रशासन लक्ष देणार काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन शेतकऱ्यांना भूमिगत पाईपलाईन जशी होती तशी पूर्ववत करुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मशीनच्या साह्याने रेतीचा उपसा करून शेतातून जड वाहतूक केल्याने मोटर पंपाची टाकलेली भूमिगत पाईपलाईन पूर्णता फोडली असून काम करणाऱ्या कंत्राटदारांनी चूक मान्य करत पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन महिने कालावधी लोटुनही पाईपलाईन टाकून दिले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून त्याच्या पिकाची मोठी नुकसान होणार आहे.
कैलास मोहुर्ले, शेतकरी भेजगाव
Discussion about this post