News34 chandrapur
कोठारी/चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात असलेल्या तोहोगाव येथे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास 3 मुले बुडाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
तोहोगाव येथील 4 मुले वर्धा नदीच्या पात्रजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते, प्रतीक नेताजी जुनघरे (11) , निर्दोष ईश्वर रंगारी 10, सोनल सुरेश रायपुरे 9 व आरुष प्रकाश चांदेकर 11 हे वर्धा नदीच्या दिशेने पोहायला व मासे पकडण्यासाठी गेले होते.
आरुष चा पोहता येत नसल्याने तो पात्राजवळ बसला होता, मासे पकडायचे असल्याने तिघे खोल पाण्यात उतरले, पाण्याच्या अंदाज न आल्याने त्यांचा तोल बिघडला व तिघेही नदीत बुडाले.
चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 3 ठार
आरुष धावत पळत मदतीसाठी गावात पोहचला असता त्यांनी सर्व बाब गावकऱ्यांना सांगितली, गावकऱ्यांनी लगेच नदीच्या दिशेने गेले असता त्यांनी सर्वत्र तिघांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही.
याबाबत पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव दलाला पाचारण करण्यात आले असता त्यांनी तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र नदीचा प्रवाह जोरात असल्याने तिघांचा शोध लागला नाही.
बचाव दलाला शोध मोहीम घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याने सकाळी शोध मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता आहे, तिन्ही मुले 9 ते 11 वर्षे वयोगटातील आहे.
तिघे नदीत बुडाल्याची माहिती कुटुंबांना मिळाल्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला.
वृत्त लिहेपर्यंत कोठारी, लाठी व तोहोगाव येथील पोलीसांची चमू त्याठिकाणी पोहचली आहे, सध्या तरी कुणाचा शोध लागला नाही.
Discussion about this post