News34
चंद्रपूर – 8 जुलै रोजी वरोरा नाका चौकातील साई हेरीटेज कॉम्प्लेक्स समोर जितू चावला यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले यांचा वाद झाला होता मात्र त्या प्रकरणात स्वतः फिर्यादी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पोलीस तक्रारीत काय?
8 जुलै रोजी दुपारच्या सुमारास जितू चावला हे निखिल तलरेजा यांच्या डेकोर दुकानात उभे होते, त्यावेळी त्यांना मोनित बेले यांचा कॉल आला, तुम्ही एकाच्या साईटवर कमी किमतीत वाळू का टाकली म्हणून विचारू लागला, सध्या तुम्ही आहे कुठं हे विचारलं आणि फोन कट केला, काही वेळात साई हेरीटेज जवळ शिवसेना लिहून असलेली चारचाकी गाडी आली, त्या वाहनातून संदीप गिर्हे, गणेश ठाकूर, मोनित बेले सहित 4 ते 5 मुले उतरली.
तितक्यात संदीप गिर्हे यांनी कम रेट मे रेती क्यो डाला असे विचारताच मारहाण सुरू केली, त्यांनतर गणेश ठाकूर व मोनित बेले यांनी सुद्धा मारहाण केली.
त्या मारहाणीत जितू चावला यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली, त्यानंतर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
फिर्यादी जितू चावला काय म्हणतात?
आमचा वाद झाला आणि तो रेती वरून झाला ही गोष्ट खरी आहे, मात्र त्या मारहाणीत संदीप गिर्हे नव्हते, मारहाण म्हणजे फक्त धक्काबुक्की झाली, त्या धक्काबुक्कीत मी खाली पडलो, खाली पडल्याने मला दुखापत झाली.
ज्या वाहनातून हे लोक खाली उतरले त्या वाहनावर शिवसेना लिहले होते मात्र त्याठिकाणी संदीप गिर्हे हे स्वतः हजर नव्हते, माझा वाद ठाकूर सोबत झाला होता, पोलीस स्टेशनमध्ये संदीप गिर्हे यांचं नाव चुकून आले, कारण जेव्हा नाव त्यात लिहले होते मी तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांना विनंती सुद्धा केली होती, मात्र रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे काय म्हणतात?
माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप धादांत खोटे आहे, कोणत्या हेतूने हे आरोप करण्यात आले याबद्दल लवकर खुलासा होणार.
Discussion about this post