News34 flood chandrapur
चंद्रपूर – काल 18 जुलै ला शहरात आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या ८० नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन चमुने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
१८ जुलै रोजी शहरात अतिवृष्टीपेक्षा अधिक सुमारे २४० मिलीमीटर पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती उद्भवण्याची संभावना होती त्यामुळे आपातकालीन परिस्थितीस तोंड देण्यास चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन चमुने शहरात राष्ट्रवादी नगर,रहमत नगर,जलनगर,तुकूम येथील संभाव्य पूरग्रस्त भागात मोहीम राबवुन ८० नागरिकांची सुटका केली व त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
आमदार वडेट्टीवार या प्रश्नावरून झाले आक्रमक
आपत्ती व्यवस्थापन चमुने मुसळधार पावसामुळे अडचण निर्माण झालेल्या अनेक शाळकरी मुलांना सुरक्षित घरी पोहचविले व अनेक नागरिकांना मनपा शाळांमध्ये स्थलांतरित सुद्धा केले. यात महात्मा गांधी कन्या शाळा रय्यतवारी वार्ड येथे ४५, महात्मा फुले शाळा घुटकाळा वार्ड येथे १३०, स्वामी विवेकानंद शाळा वडगांव येथे ४४ नागरीकांना आश्रय उपलब्ध करून देण्यात आला. शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या तसेच ११४ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात आली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे छोटे व मोठे नाले येथे जो कचरा अडकला होता ज्यामुळे पाणी थांबुन रस्त्यावर यायचे असे नाले मोकळे करण्यात आले असुन ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होती त्या भागात त्या जागी निर्जंतुकीकरण करण्यास ब्लिचिंग पावडर टाकणे,फॉगिंग,फवारणी करण्यात आली असुन या कामात २५० ते ३०० स्वच्छता कर्मचारी सतत कार्यरत आहेत.
आयुक्त श्री.विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील,उपायुक्त श्री.अशोक गराटे, श्री. मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बोभाटे,श्री.सचिन माकोडे, श्री.राहुल पंचबुद्धे पुर सदृश्य भागात प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत व संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आहेत.
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी 07172254614, 07172259406 (101), 8975994277, 9823107101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
Discussion about this post