News34
चंद्रपूर/चिमूर – 2 दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी येथील आकापूर मध्ये वाघाने महिलेवर हल्ला करीत ठार केले होते, 2 दिवसांनंतर चिमूर तालुक्यातील डोमा येथे गुराख्याला वाघाने ठार केल्याची घटना घडली असून वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हा 14 वा बळी आहे. Tiger attack
बल्लारपूर शहरात गोळीबाराची घटना टळली
ही घटना शुक्रवारी घडलेली असून शनिवारी उघडकीस आली, डोमा येथील डोमळू रामाजी सोनवाने 65 हा नेहमीप्रमाणे डोमा बिटातील कंपार्टमेंट नंबर 474 येथे 14 जुलै ला जनावरे चारायला जंगलात गेला होता.
काही वेळांनी जनावरांवर वाघाने हल्ला केला, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराख्याला वाघाने ठार केले.
सायंकाळी जनावरे घरी आले मात्र सोनावणे घरी आले नाही, घरच्या व गावातील लोकांनी जंगलात त्याची शोधाशोध केली परंतु रात्र होऊनही तो व्यक्ती दिसून आलेला नाही त्यामुळे आज सकाळीच शोधाशोध केली असता डोंमळू यांचा मृतदेह दिसून आढळून आला.
त्या मृतदेहापासूनच काही अंतरावर गोराही मारून दिसला असून त्याचा काही भाग खाल्लेल्या अवस्थेत होता, याबाबतची माहिती वन विभागाला दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर वनपाल पोरते, वनरक्षक विशाल सोनूले, वन मजूर प्रदीप ढोणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले असून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ 25 हजार रुपयांची मदत करण्यात आलेली आहे
Discussion about this post