News34
गुरू गुरनुले
मुल – गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याचे ठिकाण व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या नगरात शासनाने भव्य दिव्य उपजिल्हा रुग्णालय उभारले परंतु तालुक्यातील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पुरेशा वैद्यकीय सोई, तज्ञ अत्यावश्यक असणारे डाक्टर उपलब्ध नाही.
त्यामुळे भरती होणाऱ्या अनेक आजाराच्या रुग्णांना व अपघात झालेल्या रुग्णांना तात्काळ जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशी गंभीर अवस्था उपजिल्हा रुग्णालयाची झाली असताना शासनकर्ते लक्ष द्यायला तयार नाही. करीता रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
26 जुलै 2023 रोजी ६ दिवसाच्या मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मुलीचे आई वडील घाबरून गेले. आणि रात्री १० वाजता उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूरला नेण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना आई वडिलांनी विनंती केली परंतु रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
याबाबत मुलींच्या आईवडिलांना उपस्थित डॉक्टर व कर्मचारी यांचे प्रयत्न कमी पडल्याने मुलीला चंद्रपूरला नेने गरजेचे होते. यासाठी स्थानिक नेते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार यांचेशी संपर्क करून माहिती देताच राकेश रत्नावार तात्काळ रुग्णालयात जाऊन परिस्थिती समजून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देऊन लहानशा मुलीला चंद्रपूरला उपचारासाठी रवाना करुन दिले. वेळेवर त्या मुलीला उपचार मिळाले अन्यथा रुग्णवाहिका नसल्याने चित्र काही वेगळेच असते, मुलीच्या आई-वडिलांनी रत्नावार यांचे आभार मानले आहे.
या दुर्दैवी परिस्थितीवर शासनकर्त्यानी मूलच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील सभापती राकेश रत्नावार यांनी केली आहे.
Discussion about this post