News34
बल्लारपूर: शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षण सुद्धा आवश्यक आहे असे भूमिपुत्र ब्रिगेड व ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर द्वारा आयोजित संत तुकाराम महाराज सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर च्या बालरोगतज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून चंद्रपूरचे न्युरोसर्जन डॉ. प्रशिक वाघमारे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘करिअरवाला’ या पुस्तकाचे लेखक मा. विजय मुसळे हे होते. केवळ पारंपारीक शिक्षण न घेता बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी यावर विजय मुसळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व करिअरच्या विविध वाटा मोकळ्या केल्या.
या प्रसंगी डॉ.पि.यु. जरीले अध्यक्ष, संत तुकाराम सेवा मंडळ बल्लारपूर, बामणी हे उपस्थित होते, सदस्य अनिल वाघदरकर हे होते, तसेच जेष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक खुटेमाटे यांनी तर संचालन रुपम निमगडे ह्यांनी केले, आभार सौ.शुभांगी तिडके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुधीरभाऊ कोरडे, राजेश बट्टे, विश्वास निमसरकार, अमोल कोरडे,रंजित धोटे ,ईश्वर नेरडवार, आशिष निमसरकार यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post