News34
चंद्रपूर – देशाच्या राजकारणात आम आदमी पक्षाने स्वतःची उपस्थिती सिद्ध केली आहे, हळूहळू आप पक्ष विविध राज्यात सक्रिय होताना दिसत आहे, लहान वृक्ष आता वटवृक्ष होत असल्याचे बघून प्रस्थापित पक्षांची घाबरगुंडी उडाली आहे.
चंद्रपुरात सुद्धा आप पक्षाने विविध मुद्द्याला उचलत नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम सुरू केले आहे, नुकतंच आप पक्षाने रामसेतू पूल 6 इंच कोसळल्याची बाब जनतेसमोर आणली.
आता शहरातील अविकसित रस्त्यावरील खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देत खड्ड्यात वृक्षारोपण करीत आपल्या अनोख्या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले.
शहरातील मुख्य मार्ग खड्ड्याने विकसीत होऊ लागला आहे मात्र यावर एकही पक्ष तोंडातून ब्र सुद्धा काढताना दिसत नाही आहे, मात्र आम आदमी पक्षाने आता जनतेला होणाऱ्या समस्येवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
त्याचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागात असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करीत सत्तेत असणाऱ्या जनप्रतिनिधी यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम आप ने सुरू केले आहे.
खड्ड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नामकरणाचा निषेध कार्यक्रम आप चे युवा जिल्हा संयोजक मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात पार पडला.
सध्यातरी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पक्षात आम आदमी पक्षाने समाजमाध्यमांवर आपली मजबूत पकड बनविली आहे.
Discussion about this post