News34
चंद्रपूर/नागभीड -मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, पावसाच्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक युवक घराबाहेर पडतात मात्र काहींचा आनंद हा कधी जीवघेणा ठरतो.
अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घडली, काही दिवसांपूर्वी गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे 3 मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १६ जुलै चे सायंकाळी ४.३० वाजताची आहे. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे. शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते.
घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याचे पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार १६ जुलै चे सायंकाळी ४.३० वाजताची आहे. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे. शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याचे पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Discussion about this post