मानव हा समाजशील प्राणी आहे. जन्मापासूनच आपण इतरांशी संवाद साधत असतो आणि या संवादाद्वारेच आपण शिकतो, वाढतो आणि विकसित होतो. सामाजिक जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद आणि माहितीची देवाणघेवाण ही आवश्यक आहे. संवाद म्हणजे विचार, भावना आणि माहितीची देवाणघेवाण दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारी प्रक्रिया. यात बोलणे, ऐकणं, लिहिणं आणि वाचणं यासारख्या क्रियांचा समावेश आहे. पूर्वी माहितीची देवाणघेवाण पत्राद्वारे व्हायची. कालातंराने टेलिफोन आले. त्याची जागा मोबाईलने घेतली. आज एसएमएसद्वारे संदेश असो की ईमेलच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण असो. याद्वारे इतरांशी विचार, भावना आणि अनुभव शेअर करू शकतो. पण आज व्हाट्सऍप या मॅसेंजर ऍपने संवाद आणि संदेशाला मोठ्या शिखांरावर पोहोचविले आहे.
व्हाट्सऍप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप्लिकेशन्सपैकी एक आहे. 2009 मध्ये जन्माला आलेल्या व्हाट्सऍप प्रत्येक मोबाईलमध्ये जागा घेतली. जगभरातील लोकांना संवाद साधण्याचा आणि जोडण्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे. व्हाट्सऍपवरून मोबाईल संपर्कांना संदेश पाठविण्यासोबतच मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, व्हॉइस नोट्स आणि स्थान माहिती पाठवण्याची सुविधा देते. व्हॉट्सऍप पूर्णपणे विनामूल्य डाउनलोड आणि वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्याला डेटा शुल्क लागू शकतात, परंतु सदस्यत्व शुल्क नाही. व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला 1,024 लोकांपर्यंत गट चॅट तयार करण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सऍप पे ही भारतात उपलब्ध असलेली एक मोबाइल पेमेंट सेवा आहे. या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण देखील करता येते. व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा आहे. यात मोबाईल स्क्रिन शेअर करता येते आणि एकापेक्षा जास्त लोक एकाच वेळी मिटिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. सध्या विविध सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याची पद्धत आहे. जी 24 तासांपर्यत मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओ दाखविता येतो.
व्हाट्सऍप व्यवसायांसाठी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सऍप बिझनेस हे स्वतंत्र ऍप्लिकेशन वापरू शकता. ते लहान व्यवसायांसाठी तयार केलेले एक चांगले माध्यम आहे. ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यात मदत होते. इथे इ कॉमर्स पद्धतीने कॅटलॉग तयार करून आपल्या उत्पादनांचे फोटो, माहिती आणि किंमत दाखवू शकता आणि ऑर्डर घेऊ शकता. इतकेच नव्हेतर स्वागत संदेश, लघू व तात्काळ रिप्लाय, ऑटो रिप्लाय संदेश पाठविण्याची सुविधा आहे.
व्हाट्सऍपमध्ये भविष्यात आणखी अधिक वैशिष्ट्यांचा समावेश केला जाऊ शकतो, जसे की ऑनलाइन पेमेंटसाठी अधिक पर्याय आणि ई-कॉमर्सासाठी अधिक चांगले एकत्रीकरण, गोपनीयता वाढवण्यावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post