• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, December 28, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन

Khabarbat™ by Khabarbat™
June 26, 2024
in latest News, local News, Maharashtra
People on Square near Gateaway to India

Photo by Shubam Bhasin on Pexels

WhatsappFacebookTwitterQR Code

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन

मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्रात आवाज उठवत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज मुंबई येथे पार पडली. बैठकीला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, अबू आझमी उपस्थित होते.

वाचण्यासारखी बातमी

Guest Lecture on Recent Trends in Animal Tissue Culture Organized at Tulsiramji Gaikwad-Patil College

टक्कल व्हायरस

Ration Card : रेशनकार्डची ‘ही’ सेवा बंद होणार

हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याचा जावयावर ऍसिड हल्ला

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्रात आवाज उठवत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. #maharashtravote2024

— 𝐃𝐞𝐨𝐧𝐚𝐭𝐡 𝐆𝐚𝐧𝐝𝐚𝐭𝐞 ® (@DevShilpa14) June 26, 2024

——————-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापूजेचे निमंत्रण
आषाढी यात्रा 17 जुलै रोजी होणार

आषाढी यात्रा दि. 17 जुलै रोजी होत आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (दि. 1/5 25) सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीने दिले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. आषाढी यात्रेत वारकरी भाविकांना देण्यात येणार्‍या सेवासुविधांच्या नियोजनाची माहिती त्यांनी जाणून घेतल्याची माहिती मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. निमंत्रण देतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, अ‍ॅड. 3/5 माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही सत्कार मंदिर समितीच्यावतीने केला. यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे. याबाबत केलेल्या नियाोजनाची माहिती शेळके यांनी दिली.
——————-

भारत जोडोनंतर आता आषाढी वारी
राहुल गांधी करणार ज्ञानोबा तुकोबाचा गजर

राहुल गांधी यापुढे लोकसभेच्या विरोधी पक्षनेते या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते जनतेसोबत वावरताना, त्यांचे प्रश्न समजून घेताना दिसले. ‘जोडो भारत यात्रे’दरम्यान राहुल गांधींनी देशभरात दौरा केला आणि जनतेचं मनात घर केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभा घेतला. आता तर राहुल गांधी पंढरीच्या वारीत सामील होणार असल्याची माहिती आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केलं आणि या वारीत सामील होण्यास भाग पाडलं. अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वत: रोखू शकणार नसल्याचं दिसतंय. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत.

——————-
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. बावनकुळे बोलत होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉ. अतुल भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने – कदम, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
———–
वंचित आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर गोळीबार

बुलढाणा येथे काचा फोडण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी ( दिनांक २५) रात्री उशिरा घडली. त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळी झाडण्यात आली तर लोखंडी रॉड ने कार चे काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्राणघातक हल्ल्यातून हे दोघे बचावले आहे. काल रात्रीच्या या थरारक घटना क्रमामुळे जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यामागे हल्लेखोरांचा नेमका हेतू काय याचा पोलीस कसोशीने तपास करीत आहे.
———-
विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल

येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर्षी नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने पश्चिम विदर्भात मोसमी पावसाने हजेरी लावली. वेळेआधीच दाखल झालेला मोसमी पाऊस आणि हवामान खात्याने यावर्षी अधिक पावसाच्या दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला. त्यानंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. आठवडाभराहून अधिक काळ मोसमी पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आणि त्याचबरोबर उकड्यात देखील वाढ झाली.

मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल
शाळांमुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ
सोमवारपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, महा मेट्रो नागपूरने ही मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करत प्रवासी संख्या दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या होत्या त्याचाच फायदा नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये झाल्याच्या निदर्शनास आले आहेत. नागपूर मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्याचा फ़ायदा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला देखील होत आहे.

Post Views: 1,146
Tags: Eknath ShindeMaharashtra
SendShareTweetScan
Previous Post

ऑनलाइन पेमेंटमुळे व्यवहारात आली गती

Next Post

देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून निलंबित

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
0
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
0
किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

November 21, 2025
0
नवेगावबांध येथे शुक्रवारी एकता दौडचे आयोजन

नवेगावबांध येथे शुक्रवारी एकता दौडचे आयोजन

October 30, 2025
0
Load More
Next Post
देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून निलंबित

देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून निलंबित

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025
किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

November 21, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा