चंद्रपूर, २ नोव्हेंबर २०२३ :
किती ही वाघाची दहशत?
कशी करावी शेती?
कशी न्यायची चराईसाठी गुरे?
चार दिवसांत तीन बळी गेले.
हे घडतेय वनमंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातच!
तरीही सामसूम!
अशा आशयाचे ट्विट विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टॅग करीत ट्विट केले आहे.
या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “चार दिवसांत तीन बळी गेले. हे घडतेय वनमंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातच! तरीही सामसूम! किती ही वाघाची दहशत? कशी करावी शेती? कशी न्यायची चराईसाठी गुरे? मंत्री महोदय आपण कधी पुढाकार घेणार?”
२९ ऑक्टोबर रोजी विहिरगाव नियतक्षेत्रात मधुकर जंगलू धाडसे (४९) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार मारले. या गावातील गुराख्यांनी चराईसाठी गुरे नेणे बंद केल्याने गावातून सहा-सहा शेतकऱ्यांचे गट जनावरे चराईसाठी नेतात.
३० ऑक्टोबर रोजी निमढेला नियतक्षेत्रातील गुराखी सूर्यभान हजार (७०) हे जनावरे चराईसाठी गेले होते. यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार मारले.
१ नोव्हेंबर रोजी धानाच्या कापणीसाठी शेतावर गेलेल्या हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (६५) या महिलेचा वाघाने बळी घेतला. वनविभागाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
Discussion about this post