Babar was part of the Eknath Shinde-led Shiv Sena. Babar is a four-time MLA from Khanapur in Sangli district. While he won the 1990 and 1999 elections from the Sharad Pawar-led NCP, in 2014 and 2019, he won the polls from the ticket of undivided Shiv Sena. Shinde is heading for Sangli district.
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी आकस्मिक निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय संघर्षात ते शिंदे गटात सहभागी झाले.

जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. १९९० मध्ये ते सर्वप्रथम आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनावर शोक व्यक्त केला आहे. आमदार बाबर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे फडणवीस म्हणाले.
Discussion about this post