samruddhi mahamarg accident news today marathi
नागपूर । समृद्धी महामार्ग (शिर्डी – नागपूर) शनिवारी १४ ऑक्टोबर मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले आहेत. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. . प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना रु. ५०,००० देण्याची घोषणा पीएम मोदी यांनी केली आहे.
या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. तिथून घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने मतदकार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या २३ प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिक येथील काही भावीक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर सर्वजण नाशिककडे निघाले असता नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापूर जांबरगाव शिवारातील टोलनाक्यापासून काही अंतरावर उभ्या ट्रकवर ही गाडी धडकली. धडक इतकी भीषण होती की चालकासह बारा जणांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये चार वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. त्यानंतर स्थानिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्ण चक्काचूर झाला होता. वैजापूर पोलिसांसह रुग्णालयाला याबाबत माहिती कळल्यानंतर पाच ते सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यात बारा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. वीस जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहे. यातील १४ जणांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
अशी आहेत मृतांची नावे- तनुश्री लखन सोळसे (वय ५) , संगीता विकास अस्वले (वय ४०), अंजाबाई रमेश जगताप (वय ३८), रतन जगधने (वय ४५), कांतल लखन सोळसे (वय ३२), रजनी गौतम तपासे (वय ३२),हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०), अमोल झुंबर गांगुर्डे (वय ५०), सारिका झुंबर गांगुर्डे (४०), मिलिंद पगारे (वय ५०) आणि दीपक प्रभाकर केकाने (वय ४७) अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.
Pained by the loss of lives due to an accident in Chhatrapati Sambhajinagar district. My thoughts are with those who lost their loved ones. I wish the injured a speedy recovery. An ex-grata of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM
Samruddhi Mahamarg Accident
samruddhi mahamarg accident news
samruddhi mahamarg accident news today marathi
samruddhi mahamarg accident list
Discussion about this post