News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने वर्षपूर्ती केल्यावर त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार आजही झाला नाही, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते, मात्र आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असे संकेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून मिळत आहे.
अजित पवार हे फडणवीस-शिंदे सरकारला समर्थन देत मंत्रिमंडळात सामील होणार अशी चर्चा रंगली असताना, आज सकाळपासून अजित पवार यांनी मुंबई गाठत आमदारांची बैठक बोलावली, बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहे.
पवार नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनात दाखल झाले असून राष्ट्रवादी कांग्रेसच्या काही आमदारांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिंदे गटावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याने त्यांच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी शक्यता आहे, मात्र अजित पवार यांच्या समर्थनाने शिंदे-फडणवीस यांना मोठे बळ मिळणार.
अजित पवार यांच्या सोबत आमदार छगन भुजबळ सध्या राजभवनावर आहे, दुपारी 2 वाजता मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, किरण लहमाटे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादी कांग्रेसचे 54 पैकी 30 आमदार अजित पवार यांच्या सोबत आहे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कांग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.
अजित पवार मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री बनणार जे दुपारनंतर कळेल.
Discussion about this post