दादमहाल मदरसा येथे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि मशीद प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न काढता 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद Eid-e-Milad एकाच दिवशी, मुस्लिम समाजाने मिरवणुकीचा निर्णय पुढे ढकलला आहे. गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होत असून, गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपुरा गेट ते कस्तुरबा रोड गिरनार चौक या मार्गावर मिरवणूक होईल. या निर्णयाचे चंद्रपूर शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम सलोखा वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
The Review
ganesh chaturthi 2023
ganesh chaturthi 2023
















Discussion about this post