• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, May 29, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

khabarbat news App by khabarbat news App
April 10, 2025
in latest News, local News, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

नागपूर :नागपूर जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५) वीजचोरीचे तब्बल ४ हजार १९६ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला सुमारे ७ कोटी १९ लाख ५४ हजार रुपयांच्या ३८ लाख ३९ हजार ७२८ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या 302 ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. तर 171 वीज चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

वाचण्यासारखी बातमी

Ration Card : रेशनकार्डची ‘ही’ सेवा बंद होणार

हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याचा जावयावर ऍसिड हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर क्रांतीभूमीत; तारीख ठरली

वंचितच्या उमेदवाराने दिली लॉ ची परीक्षा; कोण आहेत भीमपुत्र विनय भांगे?

महावितरणने वीजचोरी विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये नागपूर जिल्ह्यातील ४ हजार १९६ वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी ३ हजार ८७८ ग्राहकांकडून तडजोडीपोटी १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीजचोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या २ हजार ३४५ ग्राहकांचा समावेश आहे. तर, १ हजार ८५१ ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दूरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यांसारख्या गैरमार्गांचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ३०२ ग्राहकांनी ३ लाख १३२ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ८३ लाख ४४ हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.

वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण सातत्याने कठोर पाऊले उचलत आहे. नागपूर परिमंडलात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे किंवा बंद करणे यांसारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.

आता महावितरणने वीजचोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत, सदोष मीटर तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले आणि सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी न झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली आहे.

वीजचोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Post Views: 171
Tags: MaharashtraMseb
SendShareTweetScan
Previous Post

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना l आपल्या करिअरला द्या नवीन दिशा

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

khabarbat news App

khabarbat news App

ही बातमी नक्की वाचा

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
Load More
Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते "इवाना बाय जिंदाल" चे उद्घाटन

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा