नागपूर :-
महावितरणच्या भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जैस्वाल यांना ट्रान्सफॉर्मर टेस्ट बेंच (टी. टी. बी.) या विषयावरील नाविण्यपूर्ण संशोधनाला पेटेंट प्राप्त झाले असून या पेटेंटला दि. 3 ऑगस्ट 2016 या तारखेपासून पुढील 20 वर्षांच्या कालावधी पर्यंत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांच्या स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिऍक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या संशोधनाला भारत सरकारचे पेटेंट प्राप्त झाले आहे,
ट्रान्सफॉर्मर टेस्ट बेंच (टी. टी. बी.) या विषयावरचे नाविण्यपूर्ण संशोधन कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जैस्वाल व विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफटेकनॉलॉजी येथील डॉ. मकरंद बल्लाळ यांनी सादर केले होते. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने नुकतेच पेटेंट प्रदान केले आहे. डॉ. गजानन जैस्वाल यांचे कंडिशन मॉनिटरिंग अँड हेल्थ स्टेटस असेसमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रकाशकाने पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच यापूर्वी डॉ. गजानन जैस्वाल व डॉ. मकरंद बल्लाळ यांनी रिमोट कंडिशन मॉनिटरिंग सिस्टिम फॉर डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने 2020 मध्ये पेटेंट प्रदान केले आहे. या संशोधनामुळे कमी वेळात ट्रान्सफॉर्मर ची चाचणी करणे शक्य होणार आहे तसेच चाचणीच्या सर्व नोंदी कमी वेळात डिस्प्ले वर उपलब्ध होऊ शकतो. या संशोधनासाठी डॉ. गजानन जैस्वाल यांना डॉ. मकरंद बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी डॉ. गजानन जैस्वाल यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे
Discussion about this post