• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 24, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी

#weatherwarning #imdnagpur #IMD

Khabarbat™ by Khabarbat™
December 5, 2023
in latest News, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

[tta_listen_btn]

#weatherwarning #imdnagpur #IMD Nagpur District Issued Orange Alert for Heavy Rainfall and Thunderstorms

6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार दीर्घ मुदतीच्या अंदाजानुसार, विदर्भात दि. १० ते १६ डिसेंबर, २०२३ दरम्यान हवामान स्थिती सरासरी एवढी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिनांक ०७ डिसेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास) व मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.

चंद्रपूर
पुढील पाच दिवसात ०६ ते १० डिसेंबर २०२३ रोजी आकाश आंशिक ढगाळ ते ढगाळ राहून कमाल तापमान २७.६ ते २९.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.३ ते १८.३ अंश सेल्सिअस राहून दिनांक ०६ व ०८ डिसेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक आहे तसेच दिनांक ०७ डिसेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गोंदिया
गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात ०६ ते १० डिसेंबर २०२३ रोजी आकाश आंशिक ढगाळ ते ढगाळ राहून कमाल तापमान २६.७ ते २८.१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.९ ते १८.३ अंश सेल्सिअस राहून दिनांक ०६ व ०८ डिसेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक आहे तसेच दिनांक ०७ डिसेंबर रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


भंडारा
पुढील पाच दिवसात भंडारा जिल्हयात आंशिक ढगाळ ते ढगाळ हवामान राहुन दि. ०६ ते ०८ डिसेंबर, २०२३ रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची तसेच दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात दि. ०७ डिसेंबर, २०२३ रोजी सोसाट्याचा वारा (ताशी वेग ३० ते ४० किमी), विजांचा कडकडाट व मेघगर्जना तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दि.०६.१२.२०२३ रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्पावरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर दि.०७.१२.२०२३ रोजी तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्पावरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे दि.०७.१२.२०२३ रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना व मुसळधार पावसाचा व वादळी वारा ( वेग ३० ते ४० किमी प्रती तास ) राहण्याचा गडचिरोली जिल्ह्यास इशारा देण्यात आला आहे.

नागपुर

नागपुर जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक ०६ ते १० डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश आंशिक ते मुख्यतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ०६ आणि ०८ डिसेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता, दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता, दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२३ रोजी हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील ५ दिवसादरम्यान, कमाल तापमान २७.९ ते २९.६ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १८.३ ते २०.७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता, सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७.० ते ९४.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४.० ते ६९.० टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. . पुढील २ दिवसामध्ये विदर्भामध्ये कमाल तापमानामध्ये २ ते ३ अंश सेल्सिअस ने घट होईल व त्यानंतर २ ते ४ अंश सेल्सिअस ने वाढ होईल. पुढील ५ दिवसामध्ये विदर्भामध्ये किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही.

 

Ø नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर,दि.05:  नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर  जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्‍ह्यात बहुदा सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (30ते40 किमी प्रतितास) होण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

वाचण्यासारखी बातमी

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

Parents-Teachers Conclave Organized by Department of Basic Sciences and Humanities at TGPCET, Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी घ्यावी काळजी :

संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातुन जाणे टाळावे. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात.  पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा. फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये:

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास त्या वस्तू त्वरीत बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.  शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.  विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका.  जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. तरी, जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

———————————————–

राज्यात पुन्हा पावसाचा धोका

पुणे : भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे ३ डिसेंबर रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे.

त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.

नागपूर :  हवामान भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार चंद्रपूर अंदाज जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात २९ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२३ रोजी आकाश आंशिक ढगाळ ते ढगाळ राहून कमाल तापमान २३.८ ते २८.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४.९ ते १६.३ अंश सेल्सिअस राहून दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक ३० नोव्हेंबर रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक ०१ ते ०२ डिसेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक २९ नोव्हेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट, मेघगर्जना व वादळ वारा (वेग ३०-४० किमी प्रति तास) व गारपीटीसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक ३० नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.

नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात 28, 29 आणि 30 नोव्हेंबर दरम्यान गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतचे अलर्ट जारी केले आहे.  पुढील ४८ तासांसाठी राज्यभर जिल्हास्तरीय thunderstorm इशारे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. यामुळे शेती, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे; तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे.

#यवतमाळ मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, रात्रीतून विजांच्या कडकडाटासह धूवांधार बरसणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली असून, त्यांच्या डोळ्यादेखत हाती येणारी खरिपाची पिके मातीमोल होत आहे. #unseasonalrain #Yavatmal #Maharashtra

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इतिहास आहे. 2022 मध्ये जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. अनेक घरांमध्ये गारपिटीमुळे छतावरील पत्रे उडाले होते.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश महाराष्ट्राच्या अशा सर्वच विभागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून बळीराजावर नसते संकट ओढावले आहे. तरी तातडीने या अवकाळी पावसाचे पंचनामे करून बळीराजास मदत होणे गरजेचे आहे.

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या.पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानाने हतबल झालेल्या बळीराजाला आधाराची गरज आहे राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी.बळीराजा हा सातत्याने संकटाच्या दुष्टचक्रात भरडला जात आहे. यावर्षी कमी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे, खरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहे, शेतकऱ्याचे हे वर्षच नुकसानीचे ठरले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. कापूस, तूर, सोयाबीन, कांदा, धान, सोयाबीन, द्राक्षे, आंबा, डाळींब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर इतर जिल्ह्यातही या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देशात या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान केले असून भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. शेतकरी जगला तरच आपण जगू, आपली अन्नधान्याची गरज भागवणारा बळीराजा नैसर्गामुळे हतबल झाला आहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी व गागपिटीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

अंबड तालुक्यातील हस्तपोखरी शिवारात मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे, घराचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, मोसंबी, कापूस, कांदा, द्राक्षे, शेडनेट हाऊस इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने नागरिकांना गारपिटीचा इशारा लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घराबाहेर पडताना पावसाची आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेऊन कपडे आणि इतर साहित्य सोबत ठेवावे.

गारपिटीमुळे होणारे संभाव्य नुकसान

  • शेतीचे नुकसान
  • वाहतुकीचे नुकसान
  • घरांची पडझड
  • विद्युतपुरवठा खंडित होणे
  • आरोग्य समस्या

गारपिटीपासून बचाव

  • घराबाहेर पडताना पावसाची आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेऊन कपडे आणि इतर साहित्य सोबत ठेवा.
  • गारपिटीच्या वेळी घरातच राहा.
  • गरजेच्या असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
  • गारपिटीच्या वेळी झाडाखाली उभे राहू नका.
  • गारपिटीच्या वेळी वाहन चालवत असल्यास, सावधगिरी बाळगा.

शेतकऱ्यांसाठी सूचना

  • गारपिटीच्या संभाव्यतेमुळे, शेतात पिकलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घ्या.
  • गरजेनुसार, पिकांना सावली देण्यासाठी शेतात जाळी किंवा इतर साहित्य लावावे.
  • गारपिटीचा अंदाज आल्यास, पिकांना झाकण्यासाठी सावली देण्याची व्यवस्था करावी.

The District Disaster Management Authority (DDMA) of Nagpur has issued an orange alert for the district on Tuesday, November 28, 2023. The alert is due to the possibility of heavy rainfall, thunderstorms, and lightning strikes.

The DDMA has advised residents to take necessary precautions and avoid going out unless absolutely necessary. People living in low-lying areas have been asked to move to safer places.

The Indian Meteorological Department (IMD) has also issued a yellow alert for the district on November 29 and 30, 2023. The yellow alert is for light to moderate rainfall and thunderstorms.

The DDMA has urged residents to stay informed about the latest weather conditions and to follow all advisories issued by the government.

Here are some safety tips to follow during heavy rainfall and thunderstorms:

  • Stay indoors if possible.
  • If you must go out, carry an umbrella and wear rain gear.
  • Avoid standing under trees or near power lines.
  • Seek shelter if you hear thunder or see lightning.
  • Do not drive through flooded areas.
  • If you see a fallen power line, stay away from it and report it to the authorities immediately.
  • Please stay safe and be prepared for heavy rainfall and thunderstorms in Nagpur district.
  • cyclonic rain meaning in marathi
    excess rainfall
    excess rainfall meaning in marathi
  • @mieknathshinde
    @Dev_Fadnavis
    @AjitPawarSpeaks
    @CMOMaharashtra

सावली तालुक्यातील अनेक गावात वैनगंगा नदीच्या पुराने नुकसान(Opens in a new browser tab)

चंद्रपुरात प्रेतयात्रा; मुंडण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध(Opens in a new browser tab)
या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli(Opens in a new browser tab)
Maharashtra Weather Update । महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; या जिल्ह्यात पाऊस(Opens in a new browser सावली तालुका कुणबी समाजाचा इशारा: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीकरण करू नये(Opens in a new 
Post Views: 558
Tags: bhandaraChandrapurGadchiroliGondiaHeavyRainsIMDMaharashtraMaharashtraWeathermdnagpurNagpurNashikweatherwarning
SendShareTweetScan
Previous Post

स्नेहसंमेलन (कवयित्री हर्षा भुरे, भंडारा )

Next Post

“भ्रमण ” (कवयित्री हर्षा भुरे, भंडारा)

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

April 24, 2025
0
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

April 18, 2025
0
नवेगावबांधच्या आशय डोंगरवारची बंगळूरच्या आयआयएससी इंटर्नशिपसाठी निवड

नवेगावबांधच्या आशय डोंगरवारची बंगळूरच्या आयआयएससी इंटर्नशिपसाठी निवड

April 12, 2025
0
Load More
Next Post
“भ्रमण ” (कवयित्री हर्षा भुरे, भंडारा)

"भ्रमण " (कवयित्री हर्षा भुरे, भंडारा)

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025

Recent News

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
0
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL