लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार; 8 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांकडून 15 कोटींची वसुली होणार*
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेत मोठा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. ही योजना केवळ वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या गरजू महिलांसाठी असताना 8 हजार हून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी नियम डावलून या योजनेचा लाभ घेतला आहे.
या गैरव्यवहारामुळे आता शासनाला सुमारे 15 कोटी रुपयांची रक्कम या कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी लागणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने गैरवापर करणाऱ्या 8 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि इतर विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कार्यरत कर्मचाऱ्यांसोबतच अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. वित्त विभागाने आता या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा पेन्शनमधून ही रक्कम एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले आहे.
फसवणूक करणाऱ्या दोषी महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र दिवाणी सेवा नियम 1979 नुसार शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. या योजनेसाठी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 3,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र बोगस लाभार्थी समोर आल्याने सरकारने आता या योजनेची छाननी अधिक काटेकोर केली आहे. या कारवाईमुळे केवळ गरजू महिलांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- Ladki bahin yojana यादी maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
Majhi Ladki Bahin Yojana Status Check
लाडकी बहीण योजना यादी 2025
लाडकी बहीण योजना फॉर्म
Ladki bahin yojana पैसे कधी जमा होणार
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
लाडकी बहीण योजना app












Discussion about this post