चंद्रपूर: ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आ. किशोर जोरगेवारांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या अकाउंटवरून होकार ने २ पोस्ट हि केल्या. याबाबतची वेळीच दखल घेऊन जोरगेवारांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकला आणि x च्या साईटवर जाऊन तक्रार केली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच फेसबुक आणि x अकाऊंट हॅक केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. जोरगेवार याचे फालोअर्सही मोठ्या प्रमाणात आहेत.
मागील काही दिवसांपासून त्यांच्या फेसबुक व ट्रिटर आयडीवर तांत्रिक अडचणी येत होत्या.आणि हा प्रकार उघडकीस आला. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांकडून वाच ठेवण्यात आला आहे.
Discussion about this post