कल्याण | सासऱ्याचा जावयावर ऍसिड हल्ला; वादाच्या पाठीमागे धक्कादायक कारण
कल्याणमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याने जावयावर ऍसिड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जावई ईबाद फालके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सासरा जकी खोटाल याने जावई आणि मुलीने मक्का-मदिना येथे धार्मिक यात्रेला जावे, अशी मागणी केली होती. मात्र, जावई ईबाद फालके यांनी हनिमूनसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर आज गंभीर प्रकारात झाले.
पोलिस तपास सुरू:
घटनेनंतर आरोपी सासरा जकी खोटाल फरार असून बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
पोलिसांचा बाइट:
“घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक कार्यरत आहे. जखमी जावयावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे,” असे गौड यांनी सांगितले.
या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडाली असून आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलीस व्यक्त करत आहेत.
Discussion about this post