नागपूर: वीज बिल कमी करून देण्याची मागणी करीत महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या मनोज शिवरतन लखोटिया या इसमाविरोधात हुडकेश्र्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या हूडकेश्र्वर शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्ज्ञ या पदावर कार्यरत नरेश प्रकाश धकाते, आपल्या कार्यालयात दैनंदिन काम करीत अस्तांना ऑफिसमध्ये मनोज शिवरतन लखोटिया हा व्यक्ती आला व त्याने माझे वीज बिल कमी करून द्या असे बोलला.
धकाते यांनी त्याचे वीजबिल बघितले आणि तुम्ही गणेशपेठ येथील वरिष्ठ कार्यालयात जा व त्यांना एका कागदावर पत्ता देत असतंना त्याने धकाते यांना वरीष्टांचा मोबाईल क्रमांक मागितला धकाते यांनी त्याला मोबाईल क्रमांक वैयक्तिक असल्याने देता येणार नाही असे सांगितले आता त्याने अचानक धकाते यांच्या उजव्या डोळ्यावर हात बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि दैनंदिन शासकीय कार्यात अडथळा आणला. या मारहाणीमुळे धकाते यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली.
मग इतर लोकांनी व कर्मचारी यांनी त्याला बाजूला ओढले तेंव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याला पकडून ठेवल आणि वरिष्ठांना माहिती दिली, वरिष्ठांनी लगेच याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी लगेच येत आरोपीस हुडकेश्वर पोलीस स्टेशनला नेले. याप्रकरणी हडकेश्र्वर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Discussion about this post