*धामणगाव रेल्वे —
*पिंपळखुटा येथे राहत असलेल्या ललिता पांडुरंग मडामे हिच्या घराला आग लागून तिचे घर पूर्णतः जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की घरातील भांडी कपडे व तिच्याकडे असलेले काही पैसे सुद्धा जळून राख झाले .सदर घटनेची माहिती मिळताच हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनचे सदस्य निखिल भन्साली व संघटित युवा पत्रकार संघाचे सदस्य यांनी घर जळालेल्या महिलेची मदत करण्याचे ठरविले व लगेच त्यांनी 12 हजार रुपये नगदी आणि काही दिवस पुरेल असे धान्याची किट सदर महिलांच्या गावी पिंपळखुटा येथे नेऊन तिला दिले. व सामोर ही आवश्यक असलेल्या वस्तू तिला देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. त्याच त्याचप्रमाणे तेथे आमदार प्रताप अडसड हे सुद्धा आले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळण्याबाबत चे आदेश सुद्धा दिले. यावेळी हेल्पिंग फाउंडेशनचे सदस्य निखिलजी भन्साली, संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे, उपाध्यक्ष संतोष वाघमारे ,सदस्य हितेश गोरिया, पवन बहाड अनिल शर्मा सुरज वानखडे शशांक चौधरी सचिन मून व इतर सदस्य उपस्थित होते.* *ज्यांना कुणाला मदत करायची वाटत असेल तर त्यांनी संघटित युवा पत्रकार संघाचे सदस्य व हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनचे सदस्य यांच्याशी संपर्क साधून किंवा पिंपळखुटा येथे जाऊन सुद्धा आपण त्या महिलेला मदत करू शकता असे आवाहन संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.*
Discussion about this post