- *स्वातंत्र्याचा अमृतोत्सव*
स्वातंत्र्य सैनिकांना शतशः करूनी मुजरा
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव करूया साजरा॥धृ॥
आमची जमीन,आमचे आकाश
आमचे स्वातंत्र्य,आमचा प्रकाश
नित्य विश्र्वास,नवा आमुचा ध्यास
ध्येय बाळगून नवा करूया विकास
पाहूनी स्थिरावती साऱ्या जगाचा नजरा
स्वातंत्र्याच्या अमृतोत्सव करूया साजरा ||१||
नवे पंख लपेटून,उंच भरारी घेऊ
जे नवे ते हवे असा दृष्टिकोन ठेऊ
स्वातंत्रभूमीसाठी ज्यांनी त्यागले प्राण
त्यांचे आज करू मिळून सर्व गुणगान
देशाचे रक्षक होऊनी बनूया आसरा
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव करूया साजरा ||२||
हक्क स्वातंत्र्याचा स्वप्न झाले साकार
देशाची प्रगती करू देऊ नवा आकार
येऊ देत विघ्न जरी, सामोरे जाऊ सर्व
भारतवासी असल्याचा असे आम्हांस गर्व
देश प्रगतीवर पाहूनी चेहरा ठेवू हासरा
स्वातंत्र्याचा अमृतोत्सव करूया साजरा ||३||
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post