*स्नेहसंमेलन*
(नवाक्षरी रचना)
कलागुणांना मिळे दाद
आनंदीत विद्यार्थी जन
सुप्त गुणांची पारखण
म्हणून स्नेहसंमेलन
नृत्य, गायन,चित्रकला
विद्यार्थी असतो निपुण
अभ्यासाव्यतिरिक्त छान
म्हणून स्नेहसंमेलन
वार्षिक सोहळा एकदा
शाळेत होई गुणगान
विद्यार्थी शिक्षकांचे नाते
मिळे खरे प्रेम सन्मान
होई आनंदाची उधान
सर्वच क्षेत्राची प्रगती
खेळ,सांस्कृतिक जगात
विद्यार्थी जीवनाला गती
प्रत्येक शाळेत साजरा
कलाकारांची उधळन
बक्षिसांचा होई वर्षाव
असे हे स्नेहसंमेलन
*हर्षा भुरे,भंडारा*
Discussion about this post