स्त्रीच्या मनाचा आक्रोश
सदा जपते भावना
जरी मनात वादळ
सौंदर्याची मुर्ती जणू
भरे डोळ्यात काजळ..1
सांभाळते नातेगोते
ठेवी सदा स्वाभिमान
गोड शब्द कौतुकाचे
करी अतिथी सन्मान..2
होता छळ अन्यायाचा
घेई हाती तलवार
दुर्गा, अंबा, सरस्वती
देई राक्षसांना मार..3
स्त्रीच्या मनाचा आक्रोश
दिसे जरी नवे रूप
वात्सल्याची जाण सदा
खरे शक्तीचे स्वरुप..4
स्त्रीच्या मनाचा आक्रोश
जपू सदा स्त्रीचे मन
असे सक्षम सदैव
माथी तिच्या वणवण..5
पेटवते नवी क्रांती
दूर सारते अंधार
पूजनात मान तिला
चाले आनंदी संसार…6
– हर्षा भुरे, भंडारा
Discussion about this post