आज दि.०५/०९/२०२३ ला श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
ह्याप्रसंगीसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा संस्थेतील वरिष्ठ निदेशक श्री आशिष रायपूरकर सर (अभियांत्रिकीनिदेशक ) ह्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पपुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ह्यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री राजेश पेशट्टीवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षक दिवसाचे महत्व सांगून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्वांचे प्रेरणास्थान स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे साहेब ह्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली.
ह्याप्रसंगी सर्वनिदेशक-कर्मचाऱ्यांनी प्राचार्य श्री राजेश एम पेशट्टीवार ह्यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देऊनसन्मानित केले. सर्वांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले ह्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती विद्याव्ही. येरगुडे मॅम,सचिव मा.श्री.अमित व्ही येरगुडे सर तसेच उपाध्यक्ष मा.श्री.अभिषेक व्ही. येरगुडे सर ह्यांनीसर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून तसेचकर्मचाऱ्यांना चहा-बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
khabarbat News

















Discussion about this post