*वृक्ष लागवड*
उन्हं तापली जोमाने
छाया हवीय मानवा
मिळे गारवा छायेत
एक तरी झाड लावा
फुलं फळं ताजे ताजे
खाऊ फळांचाच हवा
देह निरोगी राहिल
एक तरी झाड लावा
शुद्ध पवन मिळेल
वर्षा भरपूर यावा
हिरवळ चोहीकडे
एक तरी झाड लावा
वृक्ष लागवड करा
धरा शृंगारुन ठेवा
चिंता भविष्याची दूर
एक तरी झाड लावा
वृक्ष खरा मित्र असे
देई आरोग्य थंडावा
उपयोग प्राणी जीवां
एक तरी झाड लावा
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post