- *विषय = डॉ बाबासाहेब आंबेडकर*
(दशाक्षरी कविता)
*************************
महामेरू हा संविधानाचा
राज्यघटनेचा शिल्पकार
महामानव भारतरत्न
बहुजनांचा तारणहारबाबासाहेब आंबेडकर
दीनदुबळ्यांचा राजा खरा
लढले झटले दीनांसाठी
वाहे ज्ञानसागराचा झरावाली अस्पृश्यतेचा महान
बोधीतत्व केला अंगिकार
राजकारणी विचारातून
उठली लेखणी तलवारअर्थशास्त्राचा संपूर्ण ज्ञान
मिळाली डॉक्टरेट पदवी
हक्क न्यायाच्या शिकवणीत
एक धर्म जागला मानवीदीपस्तंभ अथांग ज्ञानाचा
न्याय ,मुलभूत अधिकार
वाट दाखवी प्रगतशील
क्रांतीकारी विशाल विचारहोते अथांग ज्ञानाची ज्योत
संघर्षाची ज्वलंत मशाल
दीनदुबळ्यांचे ते कैवारी
बाबासाहेब बनले ढालमहापरिनिर्वाण दिनाला
डॉ.भिमरावांचे गुणगान
क्रांती पेटवून समाजात
जगाया शिकवी ताठ मानथोर समाजसुधारक एक
गेला जगाला आज सोडूनी
महापरिनिर्वाण दिन हा
वंदू तयास कर जोडूनी*हर्षा भुरे, भंडारा*
*************************
Discussion about this post