*लोक काय म्हणतील..*
लोक काय म्हणतील..

का करायचा विचार?
मन मोकळे जगायच
का राहायच लाचार ?
किती ठेवायच बंधन
तोडून देऊ भय सारे
स्वछंदी जीवन जगून
येऊ द्यावे निर्भयी वारे
लोकांच काय आहे
देवालाही ठेवी नाव
लोकांकडे पाहून मग
का घरातच बसाव ?
मनाचा भ्रम असे सारा
तोंडावर कोणी न बोलत
पाठीमागे करी लावालावी
वागणे कधी नाही सोडत
स्वतःवर ठेवून विश्वास
लोकांकडे करावे दुर्लक्ष
लोक काय म्हणतील
म्हणून सोडू नये लक्ष
ध्येय आपले गाठून घ्यावे
लोक राहतील मग बघत
जगाची ही रितच न्यारी
स्तुती निंदा राहतील करत

*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post