**************************
*राजमाता जिजाबाई (पोवाडा)*
(स्वरचित पोवाडा)
ऐका महान गाथा जननीची
आ आऽऽऽ
ऐका महान गाथा जननीची
न्यायमुर्ती अशी अभिमानाची
पेटवली मशाल स्वराज्याची
आई छत्रपती शिवरायांची
र जी जी जीऽऽऽ ||धृ||
गुणी कन्या लखू जाधवांची
आ आऽऽऽ
गुणी कन्या लखू जाधवांची
अर्धांगिनी शूर शहाजे राजांची
सून करारी भोसले घराण्याची
प्रबळ इच्छा हिंदवी साम्राज्याची
जाण होती राजकारणाची
र जी जी जीऽऽऽ ||१||
जिजाबाई विरांगना महान
आ आऽऽऽ
जिजाबाई वीरांगना महान
बाळगला खरा स्वाभिमान
शिवाई देवीचा लाभला वरदान
युध्द नितीचे घेतले शिक्षण
दिले शिवबांना शिकवण
र जी जी जीऽऽऽ ||२||
दिले बालपणात धडे जिंकण्याचे
आ आऽऽऽ
दिले बालपणात धडे जिंकण्याचे
कोवळ्या मनात कठोर प्रणाचे
शिक्षण भाला ,तलवार बाजीचे
बिज पेरले नवे ध्येय,संकल्पाचे
रयतेच्या संरक्षण अन् हिताचे
र जी जी जीऽऽऽ ||३||
घडविला तेजाचा पुतळा
आ आऽऽऽ
घडविला तेजाचा पुतळा
स्वराज्याचा लावला लळा
सोबतीला सवंगडी मवळा
मुघल,निजामशाहीला तळा
आनंदाचा फुलविला मळा
गडावर आनंदाचा सोहळा
र जी जी जीऽऽऽ ||४||
दिले संस्काराचे धडे महान
आ आऽऽऽ
दिले संस्काराचे धडे महान
वाटे सर्वांना आज अभिमान
परस्त्री ही आई बहिणी समान
उंचावली देशात ताठ मान
महाराष्ट्राची वाढली शान
र जी जीऽऽऽ ||५||
धन्य झाली जिजाऊ माता
आ आऽऽऽ
धन्य झाली जिजाऊ माता
स्वराज्याचा खरी ती रचियता
ठरली इतिहातास राजमाता
स्वराज्याची लिहली महान गाथा
हर्षाने सांगितली जिजाईची थोर कथा
चरणी ठेवतो सकलजन माथा
र जी जीऽऽऽ ||६||
*हर्षा भुरे, भंडारा*
**************************
Discussion about this post