*मायेची ऊब*
मदतनीस
द्यावी चादर
मायेची ऊब
करी आदर
संकटकाळी
द्यावा आधार
मायेची ऊब
आनंद फार
गरजवंता
करावे दान
पुण्य लाभते
होई सन्मान
गोड शब्दांत
मायेची ऊब
आपुलकीची
न दाबदूब
घराघरात
आनंद दाटे
मायेची ऊब
हवीशी वाटे
माणूसकीची
जी शिकवण
मिळावी सर्वा
ही आठवण
बांधते नवी
धाग्याची दोरी
मायेची ऊब
खरी शिदोरी
- *हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post