*माऊलीचा समाधी सोहळा*
इंद्रायणी तीरावर आळंदी नगरी
समाधिस्थ संत ज्ञानोबा माऊली
भक्तीत विठ्ठलाच्या त्यागिला प्राण
वाट भक्तीची जनतेला दाखवली
माऊलीचा समाधी सोहळा आज
आळंदीत चाले भक्तीचा गजर
माऊली माऊली ज्ञानोबा माऊली
दुमदुमून जाई अवघे आळंदी नगर
लाखो भक्त होती पालखीत गोळा
दिंड्या,पताका,टाळ घेऊनिया हाती
वारकरी संप्रदायाचा पाया रचयिता
भजनात माऊलीचे गुणगान गाती
रंगतो माऊलीचा समाधी सोहळा
पुष्पांचा वर्षाव होई गुलाल उधळून
साधू संत भेटीसाठी लावती लळा
लहान थोर झिम्मा फुगडी घालून
*हर्षा भुरे,भंडारा*
Discussion about this post